श्री चक्रधर स्वामींची परभ्रमणातील अद्भुत लीला – हरताळा ते सावळदबारा प्रवास
🕉️ परिचय
📜 इतिहास
हरताळा ते सावळदबारा प्रवास :
बुलडाण्यापासून सुमारे ५६ किलोमीटर अंतरावर असलेले सावळदबारा हे महानुभाव पंथीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे.
या ठिकाणाशी श्री चक्रधर स्वामींच्या परभ्रमणातील अनेक दिव्य लीलांचा संबंध आहे.
बाराव्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करून धर्म, ज्ञान आणि भक्तीचा प्रसार केला.
त्यांचा प्रवास गंगातीराकडून सुरू होऊन कनाशी, भडगाव, पाचोरा, शेंदुणी, चांगदेव आणि हरताळा अशा अनेक स्थळांवरून पुढे चालत राहिला.
हरताळा येथे असतानाच स्वामींच्या जीवनातील एक अद्भुत प्रसंग घडला.
त्या वेळी स्वामी वाघावर बसून प्रवास करत होते. त्यांच्या तेजोमय व्यक्तिमत्त्वासोबत तो वाघ अत्यंत शांत, विनम्र आणि भक्तवत्सल भासत होता.
हे पाहून बाईसा म्हणाल्या —“स्वामी, हा वाघ किती निरुपद्रवी आहे! तो आपल्यासोबतच राहू दे.”त्यावर स्वामी सौम्य हसत म्हणाले — “बाईसा, हा वाघ आपल्याला काही करणार नाही, पण लोक त्याला पाहून घाबरतील, त्याला त्रास देतील. म्हणून त्याला इथेच राहू देऊया.”
असे म्हणून स्वामींनी वाघाला तिथेच सोडले आणि स्वतः पायी चालत सावळदबारा कडे प्रस्थान केले.बाईसा त्या काळी सावळदबाराच राहत होत्या. त्यांनी आपल्या एका शिष्याला पुढे पाठवले आणि सांगितले — की जा माझ्या भाष्याला सांग
“स्वामी येत आहेत, त्यांना घ्यायला ये.” तो शिष्य तात्काळ निघाला व बाईसा च्या भाष्याला सर्व सूचना दिली... व तो सर्व सरळ आपला घोडा घेऊन स्वामीला घ्यायला आला.व स्वामींच्या चरणी येऊन त्याने विनंती केली — “स्वामी, या घोड्यावर बसून या. पायांनी चालत तुम्हाला थकवा येईल.”
स्वामींनी त्याची विनंती स्वीकारली आणि घोड्यावर बसून सावळदबारा येथे आले. तेथे स्वामींनी वीस दिवस मुक्काम केला. या काळात त्यांनी असंख्य भक्तांना आत्मज्ञान आणि प्रेमाचा उपदेश दिला. त्यानंतर स्वामी पुढे श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे आले.
तिथे त्यांच्या वाघाची पिल्ले खेडवली. स्वामींनी त्यांना आशीर्वाद देऊन पुढील प्रवासाला निघाले. तिथून पुढे स्वामी वालसावंगी, आणि त्यानंतर मासरुळ या पवित्र स्थळांकडे गेले.
या संपूर्ण परभ्रमणात श्री चक्रधर स्वामींनी भक्ती, दया, आणि ज्ञानाचा संदेश जनमानसात रुजवला. त्यांच्या प्रत्येक पावलाने भूमी पावन झाली, आणि सावळदबारा हे स्थळ त्यांच्या कृपेने महानुभाव पंथीयांचे एक पवित्र तीर्थक्षेत्र बनले.
📍 स्थान व पोहोचण्याचा मार्ग
सावळदबारा हे बुलढाणा जिल्ह्यात स्थित एक पवित्र तीर्थस्थान आहे. हे ठिकाण बुलढाणा आणि मलकापूर या दोन्ही शहरांपासून साधारण ५६ ते ६० किलोमीटर अंतरावर आहे,
👉 येथे पोहोचण्याचे मार्ग:
🚗 रस्त्याने: बुलढाणा, मलकापूर किंवा येथून खाजगी वाहनाने सहज पोहोचता येते.
🚌 एस.टी. बसने: बुलढाणा आणि मलकापूर येथून सावळदबाराकडे नियमित राज्य परिवहन (MSRTC) बससेवा उपलब्ध आहे.
Location :-https://share.google/briNaUwHrTteFQtvl
🌿 आसपासची तीर्थस्थळे (महानुभाव पंथाशी संबंधित)
जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कृपया Like करा, तुमचे मत Comment मध्ये नक्की लिहा, आणि ही पोस्ट तुमच्या मित्र-परिवारासोबत Share करायला विसरू नका. 🙏💛
ज्यामुळे आणखी लोकांनाही या अद्भुत स्थळाबद्दल माहिती मिळेल.







0 Comments